कविता सुचतात तरी कश्या

Started by हर्षद कुंभार, January 21, 2012, 07:28:05 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


मला नेहमीच सगळे विचारतात की तुला कविता सुचतात तरी कश्या :
त्यांना हवे तसे उत्तर प्रत्येक वेळेस कदाचित मी देवू शकलो नसेल पण हे आताचे उत्तर तुम्हाला नक्कीच पटणारे असेल अशी अशा आहे.   


" प्रत्येकाच्या आयुष्यात भावनांना अनन्य साधारण महत्व आहे. किंबहुना असे म्हणा की आपण त्या भावनांना उराशी धरूनच जगात असतो. सगळे मला नेहमी हा प्रश्न विचारतात की तुला कविता सुचतात कश्या. तुम्हाला हा प्रश्न उत्तर एकदम साधे आहे . मी पण एक साधारण माणूस आहे मलाही भावना आहेत. माणसाच्या आयुष्यातल्या भावना या एक सारख्याच असतात.  त्यामुळे मीपण जे काही आजवर जगलो ते     
तुमच्या आयुष्याशी मेळ खाणारेच होते. माझ्या कविता एकदम सध्या सरळ भाषेतील असतात , त्यामुळे रोजचे शब्द अशे कलात्मक रित्या वाचताना तुम्हाला त्याची जिवंत जाणीव होते. कवितेतील भावना तुम्ही  स्वतः च्या भावनेशी जोडू पाहता. तुमचा प्रतिसाद नेहमीच हुरूप आणणारा होता, त्यामुळेच तर हे शक्य झाले मला." - हर्षद कुंभार 

डॅा. प्रशांत

जीवनाशी निगडीत मानवी भावना सर्वंाच्या सारख्याच...व.पुं.नी त्यांच्या प्रसिद्ध कादंबरी 'पार्टनर' मध्ये म्हटले आहे.."as you write more and more personal, it becomes more & more universal"....अगदी खरयं ते..

हर्षद कुंभार


प्रशांत नागरगोजे

जेव्हा कल्पनेच्या विश्वाच
शब्दांच्या भांडार्याशी नात जुळत
तेव्हा सुचते कविता.

शब्दांच्या जुळवाजुळवीची ती
एक कलाच  असते.
ती कला जमते ज्या प्रसंगी
तेव्हा सुचते कविता.

एक भावनिक हृदय
जेव्हा गाऊ लागतं
तेव्हा सुचते कविता.

तिला न वेळेच, न जागेच
कधी भानंच नसतं
खरच कधीही सुचते कविता.   

हर्षद कुंभार

very nice ***प्रशांत नागरगोजे*** . khup chan ahe kavita

#5

मनच   लिहतो मनच  वाचतो
प्रेमाला  शब्दांत  आणि
विरहास   कवितेत तो  मांडतो ....


कविता  लिहणारा  एकच   असतो
सुख  दुख  तोच  शब्दांत मांडतो
कविता म्हणजे  जाणीव असते स्वताची
आपल्याच जीवनाची पावती असते ही  कविता ...


दुसर्यांना  न  बोलता  सारे काही  बोलून  जाते
आपले अश्रू थांबवता  दुसर्यांना  रडवून  जाते ही कविता


मनच असतो  राजा खेळ  करत असतो
भावनांना  शब्दांत  बांधून  कविता करतो
लिहणारा मी कोण   ते
तर मनच लिहून  देतं
मी  तर   बाहुला  आहे  तेच मला  खेळवतं ....
-
© प्रशांत शिंदे

shashaank

माझ्या नजरेतून कविता अशी आहे -

ती मनात रुंजी घालत, ती आसपासशी दिसते
कधी येते सहज जवळ ती, कधी रुसल्यावाणी होते

कधी शब्दांसोबत येते, कधी शब्दांना घाबरते
कधी गळ्यात घाली हात, कधी दूर दूरशी असते

कधी नृत्य मनोरम दावी स्वच्छंदे विहार करते
हुरहूर जीवा कधी लावी विरहिणी आर्त आळवते

ही स्वयंवरातील मुग्धा कशी निवड कुणाची करते
ही कुणास घालील माळ कविलाही कधी ना कळते

माझ्यावर करते प्रीती का, मी तिजवर प्रीती करतो
हे कोडे तसेच ठेऊन भाव मात्र अलगद जपतो...


- शशांक पुरंदरे.

धन्यवाद.

Pallavi Koli

Kavita mhanaje bhavna,anubhav ani kalpana tancha triveni avishkar.........Pallavi Koli :)

Kalpesh Deore


मी कविता हि अशी करतो

मी असाच बसतो शांत कुठेही
विचार करतो खूप खोल जाऊनी
मनात घटनेचे चिंतन करतो
मग शब्द रूपी त्यास आकार देतो
श्रावता तसे ते गोड लागावे
म्हणुनी त्याला यमक जुळवतो
मनुष्यप्राणी विसराळू जगात
त्याच्यासाठी ते शब्दात मांडतो
प्रत्येकाचे अनुभव वेगळे
प्रत्येकाचे विचारही वेगळे
जरी असे ते का राहीना
शब्दांशी खेळुनी अर्थ पोहचवतो

कवी - कल्पेश देवरे

DSAGAR88


जेव्हा कल्पनेच्या विश्वाच
शब्दांच्या भांडार्याशी नात जुळत
तेव्हा सुचते कविता.

शब्दांच्या जुळवाजुळवीची ती
एक कलाच  असते.
ती कला जमते ज्या प्रसंगी
तेव्हा सुचते कविता.

एक भावनिक हृदय
जेव्हा गाऊ लागतं
तेव्हा सुचते कविता.

तिला न वेळेच, न जागेच
कधी भानंच नसतं
खरच कधीही सुचते कविता.
chan