जमलेच तर.....

Started by shashaank, February 01, 2012, 08:52:23 AM

Previous topic - Next topic

shashaank

जमलेच तर.....

जमलेच तर हसून पाहू कधी तरी खळखळून
नाही तर आहेच की उसने हसू ओढून ताणून

जमलेच तर फुलून येउ कधी तरी रसरसून
नाही तर आहेच की काटे-कुटे इथून तिथून

जमलेच तर गाऊन घेऊ कधी तरी मनापासून
नाही तर आहेच की तप्तसूर सदा उंचावून

जमलेच तर नाचून पाहू कधी तरी मोकळे होवून
नाही तर नाचतोच आहोत कुणाच्या तरी तालावर बाहुले बनून

जमलेच तर रडून घेऊ कधी तरी गदगदून
नाही तर आहेच नेहेमीचे नाटक नुसते मुसमुसुन

जमलेच तर देउ टक्कर कधी संकटा नजर भिडवून
नाही तर आहेच की बुजगावणे मान खाली पाडून

जमलेच तर देऊन टाकू सर्वस्वही समर्पून
नाही तर मागतोच आहोत सदैव फाटकी झोळी पसरून

जमलेच तर............



- शशांक पुरंदरे.

केदार मेहेंदळे



shashaank

मनापासून धन्यवाद केदार, विशाल - माझ्या कवितेला नावाजल्याबद्दल.......


shashaank