चूक माझी

Started by p27sandhya, February 01, 2012, 03:22:50 PM

Previous topic - Next topic

p27sandhya

आज शब्द हि अपुरे पडले
अशा भावना उस्फुर्त  झाल्या
बोलणे जमलेच नाही
नयनी धारा वाहिल्या

मज जवळ ठेव सखे
मोत्यांचे हे थेंब नयनाचे
ऋण हि नको ठेवुस
माझ्याबददलच्या भावनांचे

आज मजमुळे दुखावलीस तू
प्रेमात माझ्या हीच आणीबाणी
गुन्हा माझा असा कि तुझ्या नयनी
आले मुळातच माझ्यामुळे पाणी

देतो तुला वचन असं
नाही होणार पुन्हा
आनंदाचे अश्रू हि नाही करणार
नयनांबाहेर येण्याचा  गुन्हा

मग या थेंबांना सांगून ठेव
आता कधीच नाही वहायचं
टपोऱ्या डोळ्यांत तुझ्या
मला फक्त मलाच साठवायचं .
-----

संध्या पगारे




sandeep desai


विवेक राजहंस...


p27sandhya


केदार मेहेंदळे


madhavirandive


Niteesh


santoshi.world


p27sandhya