निरोप डोळ्यांचा

Started by ♥♪ अनुराग ♪, February 02, 2012, 09:48:48 PM

Previous topic - Next topic

♥♪ अनुराग ♪

आज सोडताना तुला
मन झाले विचलित
घेता जाहलो निरोप तुझा
वर ढगांचे सावट

आस कुठेतरी त्या डोळ्यात
मला पाहण्याची परत
तोडून सगळी बंधने
येईन कधीतरी या घरात

नको थकू देवूस डोळे
पाहताना माझी वाट सतत
जाऊ दे दोन ऋतू संपून
मी येईन पुढल्या थंडीत

उपाशी तुझ्या नेत्रांचे बाण
घुसलेले काळजात
सल त्यांची करून देईल
आठवण घेण्याची तुला मिठीत

स्पर्शताना मला थरथरत होता
तुझा हात माझ्या हातात
स्मरतील क्षण सोनेरी मला
जे घालविले तुझ्या समवेत

ठेवताना माझ्या गळ्यात हात
कचरली नाहीस तू किंचित
ठेवून मान माझ्या खांद्यावर
का पाडलेस मोहात

तुझ्या गोऱ्या मुखाचे
अबोल निष्पाप स्मित
स्मरून त्याला बसेल
माझे मन सागर ढवळीत

देवून मला सहवास
तू गुंफलेस नातं
आजपासून होवून व्याकूळ
मी पण पाहीन तुझीच वाट
       

           ...अनुराग
        shabdmuke.blogspot.in

p27sandhya

bhav sundar ahet pan jara yamak jamale havet hote as mala personally vatat sorry for that but expressions are good

T.RAHUL

kavita chan ahe...pan he SHIRSHAK  nirop dolyancha ka...?

♥♪ अनुराग ♪


आज सोडताना तुला
मन झाले विचलित
घेता जाहलो निरोप तुझा
वर ढगांचे सावट

आस कुठेतरी त्या डोळ्यात
मला पाहण्याची परत
तोडून सगळी बंधने
येईन कधीतरी या घरात

नको थकू देवूस डोळे
पाहताना माझी वाट सतत
जाऊ दे दोन ऋतू संपून
मी येईन पुढल्या थंडीत

उपाशी तुझ्या नेत्रांचे बाण
घुसलेले काळजात
सल त्यांची करून देईल
आठवण घेण्याची तुला मिठीत

स्पर्शताना मला थरथरत होता
तुझा हात माझ्या हातात
स्मरतील क्षण सोनेरी मला
जे घालविले तुझ्या समवेत

ठेवताना माझ्या गळ्यात हात
कचरली नाहीस तू किंचित
ठेवून मान माझ्या खांद्यावर
का पाडलेस मोहात

तुझ्या गोऱ्या मुखाचे
अबोल निष्पाप स्मित
स्मरून त्याला बसेल
माझे मन सागर ढवळीत

देवून मला सहवास
तू गुंफलेस नातं
आजपासून होवून व्याकूळ
मी पण पाहीन तुझीच वाट
       

           ...अनुराग
  http://kavyanurag.blogspot.in/