संपल माझ वय....

Started by balrambhosle, February 04, 2012, 09:35:50 PM

Previous topic - Next topic

balrambhosle

संपल माझ वय....
एक काळ होता..जेंव्हा
प्रेम करायचो..एकतर्फी..
मित्र बनवायचो..दुतर्फी..
डुम्मा पण मारायचो..
अन पत्त्यांचे डाव हरायचो..
कधी कॉलेज मध्ये जावून ओरडायचो..
तर कधी मुलींना जावून चिडवायचो..
क्लास मधील बोर्ड वर चित्र काढायचो..
आणि लपून छपून बिडी ओढायचो..
कुणी पकडलं तर शिवी पण खायचो.
आणि अनोळखी असलं तर शिवी पण द्यायचो..
पण आता ..काय झालंय..
प्रेम पण होत न्हाय..
नवीन मित्र पण नको हाय..
डुम्मा मारायला कॉलेज मध्ये जाव..
तर कॉलेज मध्ये पण नाही माझ नाव..
ओरडायला पण जमत न्हाय..
ओरडलं तर म्हणतात वेडा हाय..
एकटा पडलोय मी..
आता कुन्हाचीच साथ न्हाय..
जो तो मित्र दूर दूर हाय..
घरी जाव तर लग्न म्हणतात..
आणि बाहेर पडाव तर लोक कन्ह्तात..
जीवनाचा साला कंटाळा आलाय..
सांगा मित्रांनो मी आता करू तरी  काय..
हे वय हि वेळ सारख का पुढे जाते ..
आणि क्षण क्षण मनाला का खाते.
एक एक मिनट संपत आहे..
सोबत एक त्रास भिनत आहे..
कस थांबवू या वेळेला..
आणि कस मागे ओढू ह्या आयुष्याला..
जे फक्त संपणार आहे..
आणि संपणारच आहे..

-- b.s. bhosle.
-- Author Unknownहि कविता तुमची असल्यास आम्हांला कळवा. योग्य ते क्रेडिट्स देण्यासाठी MK बंधन कारक आहे.