पालापाचोळा प्रेमाचा

Started by ♥♪ अनुराग ♪, February 11, 2012, 10:23:11 PM

Previous topic - Next topic

♥♪ अनुराग ♪

तुझ्या असंख्य होकारात
मी शोधतो माझा नकार
हि व्यथा तुझी का माझी
का होतो तिचा गुणाकार

ऊर भरून तुझा
प्रेम उधळीलेस तू माझ्यावर
समजण्याची गरज भासली नाही
मला कधी येवून भानावर

अजूनही सांगतो सोडून माझा
ध्यास जा तुझ्या स्वप्न महालात
पण म्हणते कशी तूच तूच
तूच तूच माझ्या रंग महालात

अपराजित माझ्या मनाला
उगाच गवसणी घालू नकोस
कासावीस तुझ्या मनाला
गुदमरून मारू नकोस

निष्पाप माझ्या देहाला
का बनवितेस गुन्हेगार
कत्तल एका मनाची का
त्याच्या लावतेस माथ्यावर

पूजिले तू मजला सतत
तुझ्या मनमंदिरात
ठरली कवडीमोल सुमने तुझी
माझ्या मनाच्या देव्हाऱ्यात

त्रिदळ तुझ्या प्रेमाचे
अर्पू नकोस मजला
करतो सतत अवमान
समजून पालापाचोळा तुजला 



              ...अनुराग
      shabdmuke.blogspot.in

केदार मेहेंदळे