शोध प्रेमाचा

Started by हर्षद कुंभार, February 14, 2012, 12:18:13 AM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

शोध प्रेमाचा
                १४ फेब , अगदी लहान थोरांपर्यंत सगळ्यांना ही तारीख फक्त valentine डे म्हणून परिचित आहे  .
प्रेम काय असते . नक्की कशाला तुम्ही प्रेम म्हणता , नाही नाही मी इथे तुम्हाला त्याची व्याख्या सांगायला आलो नाही. हा फक्त माझ्या मनात असलेली  प्रेमाबद्दलची संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करत आहे. नाही जमले ते तरी निदान त्याचे आजचे रूप मात्र तुम्हाला नक्कीच सांगीन.     
            आजचा तरुण वर्ग प्रेमाची ओळख त्यांनी भलतीच विचित्र तयार केली आहे. आजच्या या तरुण वर्गात प्रेमाला दिखावूपणाची  जोड देण्यात आली आहे. आजची पिढी प्रेम कशी करते माहितेय काही उदाहरणे देतो तुम्हाला .
१) एकाच  वर्गात शिकताना
२) एकाच  ऑफिसमध्ये     
३) एकाच ठिकाणी राहत असलेली
४ हल्लीच जन्माला आलेले इंटरनेट   
             आजची पिढी वरील एखाद्या माध्यमाशी जोडून असल्याने प्रेमात पडलेली आढळतील. आता मला सांगा दिवसातून खूप तास एखाद्या व्यक्ती सोबत राहिल्याने साहजिक त्याची सवय होते, त्याच्या हरेक गोष्टीची कल्पना येते, आवडी - निवडी कळतात. आणि आजच्या धावपळीच्या आयुष्यात चार हसरे क्षण घालवणारे कुणी असले की त्या व्यक्तीला आपण प्रेमात असल्याची अनुभती होते. म्हणजे बघा ना जी खर तर एक सवय असते त्याला ते प्रेम समजतो.
           आता तुम्ही म्हणाल मग प्रेम म्हणायचे तरी कशाला. खर तर प्रेम ही एक कल्पना आहे जी विविध नात्यांमधून जन्माला येते.
अर्थात हे कितपत योग्य आहे हे सांगणे कठीण आहे. पण माझ्या मते आई - मुल यांचे खरे प्रेमाचे नाते असते.
स्त्री ही एका जीवाला जन्म देते जी एक नैसर्गिक किमया आहे, त्यात खरे प्रेम असते. हा पण जो वर त्या मुलाला वं मुलीला अक्कल येत नाही तोवर ते प्रेम. कारण त्यांना अक्कल आली की ते दुसरे प्रेम शोधत असतात, काय बरोबर ना हसू नका खरच बोलत आहे मी.
पण आईचे तुम्ही एकच असता आणि शेवटपर्यंत. जावूद्या हा आईच्या प्रेमाचा मुद्दा खूप गहन आणि मोठा आहे , त्यावर पुन्हा केव्हा लिहीन.
        महत्वाचे असे आहे की प्रेम म्हणजे नक्की काय जे आजच्या तरुण वर्गात प्रचलित आहे. मुलांना - मुलीना उमलत्या काळात भासणारी परी किव्वा राजकुमार हा स्वप्नापुरता असतो ज्याला कोणताच चेहरा नसतो, आपण तो चेहराच जनमानसात शोधत असतो. जेव्हा तसे कुणी मिळते तेव्हा त्या स्वप्नातल्या व्यक्तीला चेहरा मिळतो नाही का, पण तेही प्रेम आहे का 
      बरेच जन असे बोलतात की आयुष्यात प्रेम एकदाच होते मुळात मला हे पटत नाही. कारण भावना तीच असते ती कोणा एका चेहेरयाशी निगडीत का असावी. प्रेमाला कोणते रंग रूप लागत नाही, किव्वा सवयीला पण प्रेम म्हणते येत नाही. मग आता मला सांगा प्रेम म्हणजे काय
तुम्ही बोलाल एखाद्यावर जीव लावून प्रेम करणे, एकमेकांत एकरूप होणे याला प्रेम म्हणतात , खरच असे काही असते का. किती प्रेमीवीर जोडप्यांचे  लग्न होते मला सांगा, आणि किती त्यात पूर्णपणे सुखी असतात, नाही नाही तुम्ही पुन्हा चुकतंय इथे मी अरेंगे मेरेज किव्वा लव मेरेग तफावत सांगत नाहीये, दोन्ही गोष्टीत नफे तोटे आहेतच की. मुळात एकनिष्ठ असे कोण असते प्रेमात आजच्या जगात सांगा ना .       
             प्रेमात असलेल्या खूप मुलांना मी विचारले ते म्हणतात अरे GF म्हणजे नुसता त्रास आहे यार , बर झाले तू प्रेमात नाहीस ,  म्हणजे याला काय म्हणायचे मग, मुळात प्रेम ही कल्पना सगळ्यांना झेपते का , की उगाच सगळे करतात म्हणून मी पण केले असे आहे ते.
        बघा मी कुणाच्या विरुध्द बोलत नाही किव्वा कुणाला दुखावण्याचा अजिबात हेतू नाही, पण जे प्रश्न पडले त्या बद्दल तुम्हाला सांगावे म्हणून हा सगळा खटाटोप. बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहात.         
                                                                                                                                              - हर्षद कुंभार
                     
                     

Bhagyashree Phapale


हर्षद कुंभार


piya desai

तुझ खर आहे पण आपण चुकलोय ते खुप वेळात कळतय . .

हर्षद कुंभार


bornaresagar

साध्य तरी जो प्रेमात आहे त्याला बाहेर यावा असे वाटत आणि जे प्रेमात पडलेले नहीं त्याना कधी एकदा प्रेमात पडतोय असे जाले आहे .
  ;) ;)

हर्षद कुंभार


jyoti salunkhe

barobar aahe harshad ..............prem ha nusta tras .........ani prem ha ek god aabhas ........yatli konti gosta khari he tar premat asnaryanach mahit................... :D


pan lekh khup chan aahe ..........thanx :)

हर्षद कुंभार

yatala farak khup kami janana kalato jyoti. je mala thodese kalale tyabaddal mi lihile ahe. and thanx for jyoti

sia

SO SO NICE I AGREE WITH U
                                              PREM KASHALA MHNTAT HECH SAMJT NAHI??????