आई

Started by bhanudas waskar, February 15, 2012, 06:25:14 PM

Previous topic - Next topic

bhanudas waskar

आई
आईवर आज कविता सुचत नाही
तिच्या शिवाय माझे जीवन काहीच नाही
ती आहे तर सर्व काही आहे
आणि ती नाही तर काही ही नाही

तिच्या शिवाय जीवन व्यर्थ आहे
तिच्या मुलेच माझे अस्तित्व आहे
तिनेच मला या जगी आणले आहे
तिनेच मला लहनाचे मोठे केले आहे

लहानपनी मऊ भात भरविले
तिनेच मला चालायला शिकविले
चालताना पडल्यावर तिच्या डोळ्यांतुन अश्रु यायचे
आपल्याला लागल्याने तिने रडायचे

आपण मात्र हसल्यावर तिने  डोळे हळूच पुसायचे
मग तिने आपल्याला जवाल घ्यायचे
गालावर दोन पापे घ्यायचे
कढेवर आपल्याला सर्वत्र फिरवायचे

बालापनीचे दिवस कसे जातात हे तिलाच नाही कलायचे
मोठे झाल्यावर मात्र आपण तिला विसरायचे
तिला फ़क्त आपण त्रासच द्यायचे
म्हातारपनी मात्र तिला वा-यावर सोडायचे


************भानुदास*************
[/b]

mayu nakhate

very nice poem. i like