येशील का पुन्हा

Started by Rushikesh Chavan, February 17, 2012, 01:01:58 PM

Previous topic - Next topic

Rushikesh Chavan


येशील  का पुन्हा

स्वप्न विरले स्वप्नात ...
श्वास अडखळतो श्वासात...
वाट अडखळते या प्रेम मोहात ..
निघतोय मी आता सुखाच्या शोधात ...

श्वास गुंतता श्वासात
कळ येते खोलवर मनात
लपवूनी हि ओली जखम मनात
निघतोय मी आता सुखाच्या शोधात ...

खरेच.. बोललो होतो थोडे रागात
सलते ती गोष्ट आजवर मनात
मोडला सारा खेळ  एका क्षणात
निघतोय मी  सुखाच्या शोधात ...

येतेस तु अजुन माझ्या स्वप्नात
आठवते तुझे लाजणे ,हसून गालात
तुला ठेवलीय जपून काळजाच्या कोपऱ्यात
येशील का तु पुन्हा माझ्या जीवनात ...
भिजायचं आहे  मला तुझ्या प्रेम पावसात
                      तुझ्या प्रेम पावसात ......!!!!!!!!!!!

                                ऋषिकेश चव्हाण
                       (अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे ५ )

केदार मेहेंदळे


MK ADMIN

@rishichav: Chan ahe kavita...MK var apple swagat ahe..

Shital yadgire

Mast ahe kavita!mala khup avadali, very nice keep it up..