एक थवा पाखरांचा...

Started by अविनाश सु.शेगोकार, February 17, 2012, 03:21:59 PM

Previous topic - Next topic
एक थवा पाखरांचा...

सायंकाळी क्षितिजावर
खेळ सावल्यांचा,
दुरवर कुठेतरी उडतो
एक थवा पाखरांचा...

मंद सूर मंद ताल
वाहणाऱ्या वाऱ्यांचा,
दुरवर कुठेतरी उडतो
एक थवा पाखरांचा...

भिरभिर करी शाखा
उंच या झाडांच्या,
दुरवर कुठेतरी उडतो
एक थवा पाखरांचा...

कोणास कळे सुंदर
हा खेळ निसर्गाचा,
दुरवर कुठेतरी उडतो
एक थवा पाखरांचा...

कोठेतरी तोल ढळतो
वेड्या या मनाचा,
दुरवर कुठेतरी उडतो
एक थवा पाखरांचा...

असतो कधी थैमान
चंचल या वाऱ्यांचा,
दुरवर कुठेतरी उडतो
एक थवा पाखरांचा...

लांबुडका होतो आकार
नटखट या सावल्यांचा,
दुरवर कुठेतरी उडतो
एक थवा पाखरांचा...

सूर्यही घेतो विसावा
मायाळू या मातीचा,
दुरवर कुठेतरी उडतो
एक थवा पाखरांचा...

न जाणे कधी कळेल
अर्थ हा जगण्याचा,
दुरवर कुठेतरी उडतो
एक थवा पाखरांचा...

: अविनाश सु.शेगोकार
१३-०२-२०१२
www.spandan.tk

केदार मेहेंदळे