माझी प्रेयसी.....

Started by विवेक राजहंस..., February 20, 2012, 11:58:41 PM

Previous topic - Next topic

prashant12_86@yahoo.co.i

माझी प्रेयसी.....

तिला म्हणलो.., मला आज काळ झोप येत नाही..,
काय करू तुझी आठवण मला झोपूच  देत नाही...,
क्षणभर विलंब न करता तिने तिची पर्स उघडली..,
झोपेची गोळी काढून ..तिने हातावर ठेवली ...,
काय सांगू तुम्हाला माझी वेगळीच केस आहे ...,
माझी प्रेयसी...!!!!!  एम.बी.बी.एस आहे .....

मी म्हणालो माझ्या प्रत्येक श्वासात तिचाच गंध आहे...,
रक्ताच्या प्रत्येक ठेम्बास .. तुझाच रंग आहे...,
ती म्हणाली धीर धर..अजून थोडासा उशीर आहे...,
उद्या आमच्या रुग्णालयात ...मोफत रक्त शिबीर आहे...,
काय सांगू तुम्हाला माझी वेगळीच केस आहे ...,
माझी प्रेयसी...!!!!!  एम.बी.बी.एस आहे .....

मी म्हणलो तुझ्यासाठी काहीही करू शकतो ...,
माझ रुदय काढून..तुझ्या हाती देवू शकतो ..,
त्याक्षणी ती उठली ...आत निघून गेली...,
माघारी येताना ती देसेशन बॉक्स घेऊन आली...,
काय सांगू तुम्हाला माझी वेगळीच केस आहे ...,
माझी प्रेयसी...!!!!!  एम.बी.बी.एस आहे .....

एकदा तिच्याशी बोलता बोलता ठेच  मला लागली ...,
तिने तिची ओढणी ...माझ्या पायावर बांधली...,
नजरेस नजर मिळवून ..मला हळूच ती म्हणली...,
पडलास तू पण जख्म माझ्या काळजाला झाली...,
....तर माझी हे केस अशी आहे...,
माझी प्रेयसी...!!!!!  एम.बी.बी.एस आहे ..

sandip gaikwad


pushpak