अशी ती वेळ सुखाची होती

Started by Deepak Pardhe, February 23, 2012, 05:15:14 PM

Previous topic - Next topic

Deepak Pardhe

अशी ती वेळ सुखाची होती, जेव्हा मने फुलली होती,
ती माझी अन मी तिचा, हे कानी सांगुन जाती... अशी ती वेळ सुखाची होती......

आनंद तो मज जाहला, शब्दातून मग ओसंडू लागला,
किती बोलावे हे भानच न उरले, तिच्या प्रीतित मी हे जग विसरले,
अशी ती वेळ सुखाची होती, जेव्हा मने फुलली होती....

घेवुन तिला मिठीत, बसलो ऐसा अयटीत,
ती एकटीच राणी आणि फ़क्त मीच राजा, असा एक खेळ मांडला,
श्वासातुनी गुंतावुनी श्वास, फ़क्त तिचा आभास, जसा स्वर्ग आम्ही गाठला,

काय करावे, किती पहावे, पाहून मग मिठीत घ्यावे,
थोड़े बोलावे, कधी भांडावे, मग सगळे मन मोकळे करावे

आज दिवस फिरले होते, माझे प्राण सुटले होते,
मी त्याच किनारयावर होतो, एकांत अनुभवत होतो,
पण ती नाहीये जीवनात, हेच रडगाणे गात होतो,
अशी वेळ निघुनी ती गेली, जसे आयुष्य संपवून गेली,
आता काहीच नाहीये जीवनात, जशी ती वेळ सुखाची होती, जेव्हा मने फुलली होती....

येईल का परत ती वेळ, माझी सखी आणि माझा मेळ,
त्याच आठवणी आणि तोच खेळ.....
कारण ती वेळच सुखाची होती, जेव्हा मने फुलली होती,

- दिपक पारधे

anis patan