मिठी

Started by umesh kothikar, February 29, 2012, 12:49:59 AM

Previous topic - Next topic

umesh kothikar

गतजन्मातून नवजन्माची
मिठी मला दे तुझ्यात राहून
आयुष्याच्या मिठीत ये तू
पुन्हा घेउ दे तुझ्यात न्हाउन

अलगद, अलगद मी ओघळते
मिठीत घेता, कसे तुझ्यावर
हलके हलके गंध फुलांचा
जसा विखरतो या श्वासांवर

कसे मी सांगू? मिठी तुझी ही
रिमझिम रिमझिम अनुभव देते
एकांतातून तूच तूच अन
मीच मला का मिठीत घेते?

मिठी; जीवांचे अतूट बंधन
हृदयाला हे हृदय भेटते
माझ्यामधल्या अव्यक्तातून
व्यक्त होऊनी तुझ्यात येते

जातांना तू मिठीत काही
माझ्यामधले नकळत न्यावे
दूर किती असलास तरी तू
अंतर अपुले मिठीत घ्यावे


केदार मेहेंदळे


shashaank

Vow, greSSSSSSSSt........