बाप्पा, बाप्पा ऐकतोस ना ?

Started by shashaank, March 01, 2012, 09:31:47 AM

Previous topic - Next topic

shashaank

बाप्पा, बाप्पा ऐकतोस ना ?

    - (पुरंदरे शशांक)

रोज करते नमस्कार
अग्दी वाकून वाकून तुला
चुकून सुद्धा देत नाहीस
सुट्टी एक दिवस शाळेला........

कित्ती बाई सांगते याला
मोठ्ठा मोठ्ठा पाऊस पाड
ग्राऊंड बागा सोडून सार्‍या
शाळा तेवढ्या बंद पाड

कित्ती माझे हात दुखतात
एव्ढाss होमवर्क लिहिताना
उमटू दे की आपोआप
नुसती वही उघडताना

कसलं भारी दिस्तं
फुलपाखरु भिर्भिरताना
एक्दा तरी पंख दे ना
मज्जा येईल उडताना.......

एकदाच अस्सा कोन बनव
आईस्क्रीम मस्त खाताना
संपणारच नाही तो
यम्मी यम्मी म्हणताना.......

बाकी काही नाही केलेस
तरी म्हणेन जाऊं दे
आज्जी मात्र पुन्हा माझी
लग्गेच घरी पाठवूं दे.........

(शेवटचे कडवे हे कोवळ्या बालमनावर आघात करु शकेल - छोट्यांना वाचून दाखवताना कृपया सोडून द्यावे ही नम्र विनंती)
त्याऐवजी हे कडवे कसे वाटेल -

कित्ती सांगावे लागते तुला
नक्की तू ऐकतोस ना रे ?
मग जर्रा मान हलवून
'हो' तरी म्हण की रे .......

- (पुरंदरे शशांक)

केदार मेहेंदळे

khup chan.... shashank tumchi kamal aahe. itkya bal kavita lihilyat. ahsya kavita lihinya sathi khrokharch lahan mulanchya manat jata yayla pahije. je tumhala barobbar jamlay. nakkich kontya tari lahan mulachay tumhi khup khup javal asnar....

keep writing...... gr8

MK ADMIN


khup chan.... shashank tumchi kamal aahe. itkya bal kavita lihilyat. ahsya kavita lihinya sathi khrokharch lahan mulanchya manat jata yayla pahije. je tumhala barobbar jamlay. nakkich kontya tari lahan mulachay tumhi khup khup javal asnar....

keep writing...... gr8

agadhi mazhya manatla bollat tumhi...keep writing....

shashaank

श्री केदार व "मराठीकविता" अ‍ॅडमिनिस्ट्रेटर - तुमच्या कौतुकाच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद,
बालकविता हा माझा जरा आवडता प्रकार आहे. सूर - ताल - लय याची आपल्याला ओळख होते ती आपण लहानपणी ऐकलेल्या बडबडगीते, बालगीते, अंगाई यातूनच. किती साधे, सोपे शब्द वापरलेले असतात की जे आपल्याला आकर्षित करतात. पाऊस आला की अजूनही कोणाच्याही मनात "ये रे ये रे पावसा" नकळतपणे येतेच येते - हे ध्यानात ठेऊनच मी बालगीते लिहायचा प्रयत्न करतो - किती जमते हे माहिती नाही, पण तुमच्यासारख्यांच्या प्रोत्साहनाने अजून हुरुप येतो हे नक्कीच.
माझ्या बालकवितांची आवर्जून दखल घेतलीत याकरता पुन्हा एकदा धन्यवाद.
असेच प्रेम असू द्यात.
शशांक.