माझी गाणी : प्रतीक्षा

Started by prasad26, March 04, 2012, 06:25:17 PM

Previous topic - Next topic

prasad26

प्रतीक्षा


तुझी  किती प्रतीक्षा
सूर्य गेला क्षितिजा

तुझी किती मी वाट पाहिली
सांगेल तुजला इथली रेती
क्षणभर हि नाही लवली
तुझ्या प्रतीक्षेत डोळ्यांची पाती
नको पाहू हि कठीण परीक्षा

पुर्वेकडूनी रजनी ती आली
पश्चिमेस हि संध्या आली
तू ये अशी माझ्या सामोरी
लाटा ह्या उसळती सागरी
करण्यास  आपुल्या प्रेमाची समीक्षा

तुझी  किती प्रतीक्षा
सूर्य गेला क्षितिजा

केदार मेहेंदळे

Prasadji... kavita chan aahet. pach oli asleli kadvi lihin comman nahiye. tyamule vishesh abhinandan. "Mazi Gani" ha jar tumcha vishesh kinva ekhdya thim var adharit sangraha aasel tar prtyek kavitet adhichya kavitechi link dya mhnje ekhadyala pahije aslyas hya sangrhatlya saglya kavita vachta yetil.


prasad26

केदार -प्रथम - जी etc नको please 
नुसते प्रसाद ठीक
आपल्या सगळ्या अभिप्रायांबद्दल आभार

मी माझ्या scientist च्या भूमिकेत इतके दिवस खूपच अडकून पडल्याने -english मधील शास्त्रीय लेख व patents च लिहिण्यात मग्न होतो आणि मराठी मध्ये लिहिलेल्या कविता नुसत्याच कागदावर होत्या.

मी हळू हळू bloggers वर -माझी गाणी - ह्या ब्लोग च्या सदरात प्रकाशित करत आहे आणि तसेच मराठी कविता ह्या site वर हि.
http://mazigani-prasad.blogspot.in/
मला त्या ब्लोग वर कविता type करणे सोपे जाते पण "मराठी कविता" हि site मला जास्त भावली.
तरी अजून तरी संग्रह पूर्ण झाला नाही आहे.