जीवन

Started by श्रीकांत देशमाने., March 06, 2012, 05:01:05 PM

Previous topic - Next topic
काव्यात जीवन की जीवनात काव्य
नेमके मला कळत नाही
'डेली रुटीनच्या 'चक्रात अडकलेल
जगणंही मला जमत नाही

माझ्या परीने कवितेचा
अर्थ वेगळा मी लावतो
धकाधकीच्या जीवनात हरवलेले
क्षण पुन्हा एकवार जगतो

तसं कविता करणे हा
माझा प्रांत नाही
भावना आवरू शकतो
शब्दांचा हट्ट जात नाही

कवितेतून प्रेमाचा अविष्कार करणे
आजकालची fashion बनलीय
प्रेमवेडी कविताही आज
कितेकांच्या 'दिल की धडकन' बनलीय

असत कवितेत कधी कधी
पर्ज्यन्यधारांच बरसण.....
तर कधी असत
नुसतंच कळीतून फूलाच उमलण ...

कधी कधी कविताही
नागमोडी वळणे घेत येते
जीवनातल्या खाच खळग्याना
अर्थ वेगळा देऊन जाते

खुपदा अस वाटत
आपणही कविता करावी
तिच्या स्वप्नील डोळ्यांना
शब्दांची ओंजळ वाहावी

.....आणि मग माझी
भावना बोलकी होते
शब्दांच लेणें लेऊन
............'कविता' बनून येते :)
                   

           ..........श्रीकांत देशमाने.

केदार मेहेंदळे