तुझा अबोला

Started by sindu.sonwane, March 11, 2012, 06:34:54 PM

Previous topic - Next topic

sindu.sonwane

तुझा अबोला

तुझा अबोला खूप काही बोलून जाते
तुझी नजर खूप काही सांगून जाते
तू नसतानाही तुझ अस्तित्व असते
तुझ्याशी खूप काही बोलायच असते
पण, मीच किती वेडी आहे
प्रेम तर शब्दांच्या पलीकडची भावना आहे
विश्‍वासाच नाजूक बंधन आहे

दोन आत्म्याच मिलन आहे
शरीर संपूनही आत्मा मात्र अमर आहे
असच माझ प्रेम आहे

अबोल असूनही प्रेमाला जपणार अनुभवणार
दूरवर असूनही मनाच्या अगदी जवळ असणार.
                                                        सिंदू .


केदार मेहेंदळे