गडवाट .!!!

Started by ankush patil, March 12, 2012, 09:23:33 PM

Previous topic - Next topic

ankush patil

जपून टाका पाऊल फारच अरुंद आहे वाट
फितुरीची शतवर्षाची त्यात इथे वहिवाट
पडतील गडकिल्ले पडतील बुरुज
पसरेल साथीने चोहीकडे फक्त खरुज
सदा एकटा शंभू समईवाचून राहतो उदास
पाहुनी अंधारालाही जीवन वाटे उदास
जागे झालेत आता मावळे जागे झाले भक्त
आसवे रोखून उभा राहिले राखण्या तक्त
"दौलतीचे सुतक" -म्हणाला इथे भटक्या एक
करत बसला तुळापुरी दुग्धासह शंभूभक्तीचा अभिषेक
पाहून सारे आज मी सांगत  आहे
नाही संपणार रक्त नाही सुटणार गाठ
जोवर  राहतील गडकिल्ले तोवर राहील गडवाट .!!!

कवी-अंकुश पाटील(निरांकुश)