माझी गाणी : गीत छंद

Started by prasad26, March 13, 2012, 02:19:19 PM

Previous topic - Next topic

prasad26


गीत छंद

गीत गाण्यात मज होई आनंद
आनंदात गाणे हाची माझा छंद

शब्दांना फुटले सुरांचे पंख
गीतांच्या आकाशी झाले ते दंग
कल्पनेत मी राजा जरी असे रंक
राणी सवे माझी प्रीत होई धुंद

कधी होते मुखातुनी निसर्गाची स्तुति
देवाच्या स्तुतिला कुंठते मती
यौवनाच्या रंगमंची कधी नाचे  रति
सोडूनी जगाचे सर्व कटू बंध

खळखळनारा झरा मला देतो साथ
कधी माझ्या साथीला समुद्राची लाट
हिरव्या रानात पक्षी घालती साद
सुरे ते  घेउनी जाई वारा तो मंद
आनंदात गाणे हाची माझा छंद

-------प्रसाद शुक्ल

केदार मेहेंदळे

mast.... kavi asnyache he fayde aahet. jagat kay aahe kay nahi farak padat nahi. kavich swatach vishwa tyala hav tas ast.