मैत्री... आपली..

Started by Rohit Dhage, March 15, 2012, 09:59:14 AM

Previous topic - Next topic

Rohit Dhage

तुला माहितीये
एक तर आधीच विरह दुःखात असायचो
आणि त्यात तूझ्यावरून डोकं उठायचं
झकास वाटतंय आता..
तुझ्यामुळेच..!!
तू....  तू माझ्या लक्षातच आली नाहीस
भांडणं आणि चिडवण्यातच वेळ गेला माझा
हो ना!!
मूर्ख वाटायचीस तू मला
अगदी मनापासून.. :)
अगदीच चुकीचं आहे असंही नाही
पण मस्त वाटतीस आता तू..
अलीकडे बरीच उलगडत गेलीस तू मला
तुझं हसणं.. आपल्याच दुनियेत असणं
तुझं रुसणं.. कुणाच्या कानात फिसफिसणं
सगळंच मस्त वाटायला लागलंय.. :D
तुझी जायची वेळ आली आणि माझी जागं व्हायची
.... तरीही आवरेल मी स्व:ताला
असाच तडा नाही जाऊन देणार
असंच हसत राहू..
भांडत राहू... लटक्या रागाने..
आणि ओरडता रागवतानाही,
असंच फिद्कन हसू..
डोळ्यातल्या डोळ्यांमध्ये....  :)

- रोहित

केदार मेहेंदळे


Rohit Dhage



Rohit Dhage


PSoniya


Rohit Dhage


prasad26

अलीकडे बरीच उलगडत गेलीस तू मला

तुझी जायची वेळ आली आणि माझी जागं व्हायची

Liked these lines and yes overall too v good expressions

Rohit Dhage