पण राजे तुमच्या पुतळ्याने इथे प्रदूषण होतंय..!

Started by ankush patil, March 15, 2012, 12:10:13 PM

Previous topic - Next topic

ankush patil

कोल्हापूरच्या पंचगगेत मासे मरताहेत
रंकाळ्यात केंदळ तर नेहमीचाच आहे
मरुदेत मासे मरुदेत माणसे यांना सुतक येणार नाही
त्याने काहीच होणार नाही
पण राजे....
पण राजे तुमच्या पुतळ्याने इथे प्रदूषण होतंय..!

पवित्र गंगेत आता पापे मिटत नाहीत
मिटतात फक्त डोळे पाण्याची अवस्था पाहून
यांची रांग साईबाबाच्या दारात असेल
त्याने काहीच होणार नाही
पण राजे....
पण राजे तुमच्या पुतळ्याने इथे प्रदूषण होतंय..!

भर रस्त्यात  प्राण्याचे पुतळे झाले
स्वताच्या बापाचे पुतळे उभारले
बापाच्या मयताचे साहित्य नदीत सोडतील
त्याने काहीच होणार नाही..
पण राजे....
पण राजे तुमच्या पुतळ्याने इथे प्रदूषण होतंय..!

मराठी नेत्यांनी दिल्लीत मान झुकवलीय
पुढार्यांनी पैसे देवून जनता वाकवलीय
स्वताच्या वाढदिवसाला हारतुरे पाण्यात फेकून देतील
त्याने काहीच होणार नाही...
पण राजे....
पण राजे तुमच्या पुतळ्याने इथे प्रदूषण होतंय..!
>अंकुश पाटील(निरांकुश)
एवढी चांगली नसली तरी शहाण्याला शब्दाचा मार बस आहे...!

केदार मेहेंदळे