काल सांजेची सर

Started by paturkar.kedar27, March 16, 2012, 10:37:13 AM

Previous topic - Next topic

paturkar.kedar27

काल सांजेची सर मनाला हुरहुर लावून गेली....
तू नसताना तुझ्या विचारांचे काहूर उठवून गेली....
त्या हलक्या सरीने मातीचा असा काही गंध उठला होता,
जणू बाजूने अलगद तूच गेली असावी...
कालच्या सरीचा थेंबनथेंब इतका ताजा होता,
जणू काही ती सर तुलाच स्पर्शुन आली असावी...
काल गार हवा माझ्याशी तुझ्याबद्दलंच बोलत होती...
आणि पावसाची रिमझिम मला तुझीच आठवण देत होती...
कालच्या सरीच्या प्रत्येक थेंबात मला तू सापडत होतीस...
जणू काही बरसणारी सर नाही, तूच होतीस...
कालच्या सरित भिजताना तुझ्यासोबत असल्यागत वाटत होतं...
कालच्या सरित तुला जाणवून मन उगाच आनंदत होतं...
एवढ्यात आकाशात एक वीज चमकून गेली...
एवढ्यात आकाशात एक वीज चमकून गेली...
आणि, मला तू सोबत नसल्याची जाणीव झाली....
त्या जाणिवेने आनंद्लेलं मन छोटसं झालं...
आणि,प्रत्येक ठिकाणी तुला शोधणाऱ्या डोळ्यांत पाणी आलं...
मला कळत नाहीये कालची सर नेमकी कोण होती...
कारण, ती देखिल तिच्या अस्तित्वात माझे अश्रु लपवत होती...

केदार मेहेंदळे

मला कळत नाहीये कालची सर नेमकी कोण होती...
कारण, ती देखिल तिच्या अस्तित्वात माझे अश्रु लपवत होती...

mast...

mahesh4812