स्मशानसुख न्यारेच होते.....

Started by genius_pankaj, March 24, 2012, 07:43:14 PM

Previous topic - Next topic

genius_pankaj

माझे माझे म्हणत होतो ज्यांना

हाय ते शेवटी उपरेच होते



भिकाऱ्यास होती सदा बंद दारे

सुवर्णहात चाटण्या सारेच होते



तिच्याकडून वाटली मिळतील थोडी फुले

पण तिच्याही मुठीत निखारेच होते



उगा अंगावरी कधी उठले कोवळे शहारे

वाहणारे मात्र शुष्क वारेच होते



चोहीकडे दुःखाचे नुसते घुसळलेले सागर

संगतीला केवळ पापण्यांचे किनारेच होते



उगा जीवितासाठी चालू होती धडपड

सरणावर कळले स्मशानसुख न्यारेच होते


genius_pankaj

[/size][/b][/i]

केदार मेहेंदळे


प्रसाद पासे

apratim.......
"उगा जीवितासाठी चालू होती धडपड
सरणावर कळले स्मशानसुख न्यारेच होते"
he kadav farach sundar