तूच सांग सखे की उत्तर देऊ मी

Started by प्रशांत नागरगोजे, April 02, 2012, 08:06:50 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

तूच सांग सखे की उत्तर देऊ मी
तासंतास बसून मी
जिथे तुझी वाट पाहायचो
ती जागा विचारते मला
"का रे , आजही नाही येणार ती ?"
तूच सांग सखे काय उत्तर देऊ मी?

क्षितिजापर्यंत चालत जायचो आपण
मावळतीचा सूर्य पाहायचो आपण
आज तो सूर्य मला काय विचारतो माहितेय ?
"का रे, तिला नाही आणलस आज?"
तूच सांग सखे काय उत्तर देऊ मी?

त्या नदीच्या पाण्यात पाय बुडवून
तासंतास बसायचो आपण
ती नदी नेहमी विचारते मला
"का रे इतका रडतोस तू?"
तूच सांग सखे काय उत्तर देऊ मी?

ते पक्षी, ते झाड, ते फुल, त्या वेळी
हिरमसून गेलेत सर्व
जेव्हा कधी भेटतात एवढंच विचारतात
"का रे, कधी आणशील तिला परत?"
तूच सांग सखे काय उत्तर देऊ मी?

***प्रशांत नागरगोजे***
दिनांक:२६/३/१२
ठिकाण: सांगली (१३:10)

केदार मेहेंदळे




jyoti salunkhe

Really nice..... :)