सांजवेळी तळ्या काठी येशील का?

Started by केदार मेहेंदळे, April 09, 2012, 12:31:28 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

कवीमित्र श्री राहुल ह्यांच्या "तळ्याकाठी सांजवेळी भेटीसाठी येशील का ? ह्या सुंदर कवितेवरून सुचलेली कविता.
   


क्षितीज रेषेवर सांज थांबली
उडे बगळ्यांची माळ अंबरी
नकळत होता स्पर्श हातासी
फिरवून चेहरा लाजशील का?
सांजवेळी तळ्या काठी येशील का?

पश्चीमेच्या शीतल लहरी
स्पर्शत असता तुझ्या पदरासी
खेळीन अवखळ तुझ्या बटांशी
खेटून मजला बसशील का?
सांजवेळी तळ्या काठी येशील का?

बकुळ फुलांचा सडा सुगंधी
अंगांगावर रोमांच फुलवी
करीत उधळण प्रणय गंधाची
स्पर्शानी बेधुंद करशील का?
सांजवेळी तळ्या काठी येशील का?

झाडावर   मैनेची जोडी
प्रणय सुरांची छेडते आलापी
रिधय सुरांच्या छेडीत तारा
प्रेम गीत तू गाशील  का?
सांजवेळी तळ्या काठी येशील का?

माळून गजरा केसांत तुझ्या मी 
गुपित सांगता कानांत तुझ्या मी
गुलाब पाकळ्या फुलवून गाली
मिठीत मोगरा फुलवशील का?
सांजवेळी तळ्या काठी येशील का?

सांग सजणी.......
सांजवेळी तळ्या काठी येशील का?
फिरवून चेहरा लाजशील का?
खेटून मजला बसशील का?
स्पर्शानी बेधुंद करशील का?
प्रेम गीत तू गाशील  का?
मिठीत मोगरा फुलवशील का?
सांजवेळी तळ्या काठी येशील का?


केदार...

www.facebook.com/freemarathisms



Rohit Dhage


prasad26

WOW !!!
Dolyasamor chan chitra nirman karate kavita.
sahaj mhatlele shabda pan bhavana utakt pane vyakt karatat.
Kedar --kavita khup awadali .
pratyek kadvyamadhun vicharalela prashna -khup sundar.


केदार मेहेंदळे