खारुताई....

Started by shashaank, April 09, 2012, 03:32:15 PM

Previous topic - Next topic

shashaank

सरसर सर्सर झाडावर
सरसर सर्सर फांद्यांवर
तुर्तुर तुर्तुर पळते खार
शेपूट उडवत झुबकेदार

लुकलुकते काळे मणी
दिसते कशी गोजीरवाणी

पुढचे पाय उंचाऊन
हातात जणू खाऊ धरुन
खाते कशी कुरुम कुरुम
खार बघा जरा दुरुन

जवळ जाताच पळते लांब
खारुताई भित्री जाम

सेतूमधले काम जाणून
श्रीरामाने हात फिरवून
आशीर्वाद दिला भरभरून
मिरवते अजून पाठीवरुन .......



(shashaank purandare)

केदार मेहेंदळे

ya balkavi.... baryach divsaanni bal kavita vachayla milali.....
khup chan kavita.

vidyakavita



Vaishali Sakat


shashaank


Ratnadeep Rane

सेतूमधले काम जाणून
श्रीरामाने हात फिरवून
आशीर्वाद दिला भरभरून
मिरवते अजून पाठीवरुन

Nice Lines !!!!!

Madhura Kulkarni

"सेतूमधले काम जाणून
श्रीरामाने हात फिरवून
आशीर्वाद दिला भरभरून
मिरवते अजून पाठीवरुन"
या ओळी नसत्या तरी चालले असते. कारण हि बालकविता आहे न.....

पण बाकी कडवी मस्त आहेत. खारुताईवरची कविता खूप दिवसांनी वाचली.

shashaank

सर्वांचे मनापासून आभार....