वेगळीच कविता

Started by vaibhav joshi, April 17, 2012, 05:17:55 PM

Previous topic - Next topic

vaibhav joshi

वेगळीच  कविता
 
परवा आजीच्या फोटोला फुले वाहताना वाटले की आपल्यालाही असेच एकदा फोटोत जायचे आहे
  असलो जरी आज "बेढब" तरी उद्या "चौकोनी" व्हायचे आहे
मग माझ्या चौकोनाला कुणीतरी 'गोल' हर घालेल
किराण्याचा कुजका दोरा सुवासिक फुलांचा भार पेलेल
  तेव्हा हे मला कसे कळेल देव जाणे, तोपर्यंत जळो जिणे लाजिरवाणे
  नको हे लाजिरवाणे जिणे असे मनापासून वाटते,
   डोळ्यांमधले पाणी डोळ्यांमधले पाणी डोळ्यां मध्येच आटते,
   मग वाटते की, फोटोतल्या 'केविलवाण्या' चित्रापेक्षा एक 'कैवल्यवाणी' विचित्र रांगोळी बनूया
  थेंब जरी 'निश्चित' असले तरी नक्षी वेगळी काढूया!
   ---- वैभव वसंत जोशी, पुणे

prasad26

असलो जरी आज "बेढब" तरी उद्या "चौकोनी" व्हायचे आहे

थेंब जरी 'निश्चित' असले तरी नक्षी वेगळी काढूया
Hya oli khup kahi chan sangun jatat
Sundar kavita.

MK ADMIN

असलो जरी आज "बेढब" तरी उद्या "चौकोनी" व्हायचे आहे

थेंब जरी 'निश्चित' असले तरी नक्षी वेगळी काढूया
Hya oli khup kahi chan sangun jatat
Sundar kavita.

yes..mala suddha...mast oli ahet...kavita suddha chan ahe..

केदार मेहेंदळे

chan kavita....
मग वाटते की, फोटोतल्या 'केविलवाण्या' चित्रापेक्षा एक 'कैवल्यवाणी' विचित्र रांगोळी बनूया
  थेंब जरी 'निश्चित' असले तरी नक्षी वेगळी काढूया!

wwaa....