मनाचं पुस्तकालय (कल्पेश देवरे )

Started by Kalpesh Deore, April 18, 2012, 12:12:01 PM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore

मनाचं पुस्तकालय

मनात माझ्या तुझ्या नावाचं
पुस्तकालय आहे
तुझ्या गजर्याच्या सुगंधाने
जणू सुगंधित झाले आहे

रोज तुझ्या नावाचं
मी एक पुस्तक वाचतो
प्रत्येक पण पालटावतांना
तुझा स्पर्श मला जाणवतो

तुझं स्मित जणू दिसे मला
ओळी नंतरचा सल्प विराम
तुझा सहवास कळे मला
पाहता वाक्याचा पूर्ण विराम

तुझ्या सोबतचा चहाचा कप
असे तो माझा पूर्ण धडा
काळ्या रंगाची अक्षरे जणू
दिसे मला तुझ्या डोळ्यांच्या कडा

तुझ्या ओठावरची लाली
जणू गोड गोड ती कविता
तुझ्या रुपाची जाणीव होत
ती कविता सरता सरता

कोलेज मध्ये असतांना
मी कसा बसा तुला पाहतो
मनाच्या पुस्तकालयात शिरून
मी रोज तुला निहाळतो

कवी - कल्पेश देवरे 



Kalpesh Deore

मनापासून धन्यवाद ज्योती ....

asmita!!

तुझं स्मित जणू दिसे मला
ओळी नंतरचा सल्प विराम
तुझा सहवास कळे मला
पाहता वाक्याचा पूर्ण विराम


Kalpesh Deore

माझ्याही ह्या आवडत्या ओळी आहेत...