ओढ तुझी - माझी

Started by Dr.Vinay Kalikar, April 20, 2012, 08:14:20 PM

Previous topic - Next topic

Dr.Vinay Kalikar

एक अणु तू महान
खुजा रेणू मी लहान
न मन अनमान
दोघांमध्ये .

मी तुझ्याकडे पाही
तू विश्वाकडे पाही
विश्वच घर होत जाई
तुझ्यासंगे .

कधी येई तुफान
वणवा पेटवी ग रान
जन करी हैराण
अध्येमध्ये .

तरी संसार सुखाचा
पटाईत नावाड्याचा
पैलतीर नाव नेई
प्रलयामध्ये .

होईन मी अगतिक
अन ,तू पराधीन
मोठी ओढ तुझी - माझी
मनामध्ये .

__विनय काळीकर __


केदार मेहेंदळे