तरी मी असाच उभा होतो (कल्पेश देवरे)

Started by Kalpesh Deore, April 20, 2012, 08:49:28 PM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore

तरी मी असाच उभा होतो

अशांत समुद्रा सारखी
माझ्या मनाची दश्या
वाटलं आयुष्यात पुन्हा
उगवेल नव्या स्वप्नांची उषा

पण भरल्या हातातली वाळू
जशी सरकण निसटली
अन् आयुष्याची दौलत सारी
एका झटक्यात वाहून गेली

पुन्हा एकदा आयुष्य सावरेन
म्हणून वाट पाहत होतो
पाया खालची वाळू सरकली
तरी मी असाच उभा होतो

तिच्या मनातले भाव
मला समजताच आले नाही
अन् माझ्या आतली धडपड
तिने कधी ओळखलीच नाही

पैश्यानेच सगळं मिळतं
हे असंच मनात धावलो
नात्याची कडी कचकन तुटली
मी एकटाच घरात उरलो

आयुष्याच्या दुपद्री मार्गावर
मी एकटाच चालत होतो
पाया खालची वाळू सरकली
तरी मी असाच उभा होतो

पाया खालची वाळू सरकली
तरी मी असाच उभा होतो

कवी - कल्पेश देवरे 

santoshi.world