तीन ऋतू

Started by vaibhav joshi, April 21, 2012, 11:53:28 AM

Previous topic - Next topic

vaibhav joshi


पावसाळ्यात ढग दाटून येतात
त्याचबरोबर काहींचे कंठही दाटून येतात
सुख,सुख आणि फक्त सुख पाहणारे सारेच असतात
मात्र दुखातही सुख पाहणारे फार थोडे असतात
या फार थोड्यांचा वाटतो मनाला जिव्हाळा
आणि मग नेमेचि येतो उन्हाळा...

उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होते
घामाने चिंब भिजून शर्टाची बाही होते
छाया, छाया आणि फक्त छाया घेणारे सारेच असतात
मात्र स्वत: तापून दुसऱ्यांना छाया देणारे फार थोडे असतात
या छाया देणाऱ्यांच्या आठवणीने दाटून येतो उमाळा
आणि मग नेमेचि येतो हिवाळा...

हिवाळ्यात कुडकुड करवणारी थंडी जास्त असते
उष्मेची शेकोटी वरच 'भिस्त' असते
उब, उब आणि फक्त उब घेणारे सारेच असतात
मात्र मायेची उब दुसऱ्यांना देणारे फार थोडे असतात
या उब देणाऱ्यांच्या मायेने मनातील आठवणीना नकळत मिळतो उजाळा
आणि मग नेमेचि येतो पावसाळा
          नेमेचि येतो पावसाळा...

--- वैभव वसंत जोशी, अकोला   

केदार मेहेंदळे

khup chan jodni keli aahe... awadli kavita.

vaibhav joshi

धन्यवाद केदारजी
               कवितेवर एकदा 'रिप्लाय' आला की आपण अगदीच काही वाईट लिहित नाही याची खात्री पटते.
''हौसला आफ्जाई'' साठी शुक्रिया !