प्रेम काहीसं असं असावं...

Started by vaibhav joshi, April 21, 2012, 12:11:22 PM

Previous topic - Next topic

vaibhav joshi

प्रेम काहीसं असं  असावं...
धुतल्या तांदळासारखं 'स्वच्छ'
प्रेम असावं तजेलदार
जसा ताटव्यातला गुलाबांचा 'गुच्छ'
   
प्रेम काहीसं असं  असावं
कर्णासारखं दानशूर
प्रेम असावं धरणासारखं
फुटत येई प्रीतीचाच महापूर 

प्रेम काहीसं असं  असावं
फुलासारखं 'नाजूक'
प्रेम असावं दिव्यासारखं
तूप लागेल पण फक्त 'साजूक'

प्रेम काहीसं असं  असावं
जसा शिंपल्यातला मोती
प्रेम असावं त्यागासारखं 
जशा प्रकाश देत विझून जाणाऱ्या वाती...!

--- वैभव वसंत जोशी, अकोला 

Vaibhav jite