मी गेल्यावर...

Started by vaibhav joshi, April 21, 2012, 12:52:06 PM

Previous topic - Next topic

vaibhav joshi


मी गेल्यावर असे करा. 

मरणाचे 'उत्सव' करू नका

रडू नका, दुखी होऊ नका

माझ्या आठवांचा एक मोती मात्र

तुमच्या मनाच्या शिंपल्यात जपून ठेवा 


मी गेल्यावर असे करा..

माझ्या नावाचे 'तर्पण' करू नका

करायचेच असेल तर अर्पण करा

माझ्या वस्तूंचे गरजवंतांना !


मी गेल्यावर असे करा..

माझ्या नावाने कुठलाही  पुरस्कार नको,

माझ्या नावाने कुठलीही स्पर्धा नको

फक्त देवाच्या मंदिरात भक्तांना नेण्यासाठी

माझ्या नावाची एक 'पायरी' मात्र बांधा


मी गेल्यावर असे करा..

जमिनीत एक छानसे बी पेरा

खत म्हणून माझी राख आहेच, पाणी म्हणून

माझ्या दाटलेल्या अश्रुंचे पाट रोपाच्या आळ्यात भरा

मी गेल्यावर असे करा..

नको ते प्रश्नार्थक चिन्ह, नको ते उद्गारवाचक चिन्ह, नको तो अर्धविराम अन स्वल्पविराम

यांपेक्षा 'पूर्णविरामच' बरा

मी गेल्यावर असेच  करा..!

--- वैभव वसंत जोशी, अकोला 

केदार मेहेंदळे



jyoti salunkhe

Very Nice Poem Specially the Following Para...... :)

मी गेल्यावर असे करा..

जमिनीत एक छानसे बी पेरा

खत म्हणून माझी राख आहेच, पाणी म्हणून

माझ्या दाटलेल्या अश्रुंचे पाट रोपाच्या आळ्यात भरा

मी गेल्यावर असे करा..

vaibhav joshi

धन्यवाद केदारजी अन माझे इतर सहृदयी कवी 
                           
      कवितेवर एकदा 'रिप्लाय' आला की आपण अगदीच काही वाईट लिहित नाही याची खात्री पटते.
    ''हौसला आफ्जाई'' साठी शुक्रिया !