!!!! -- स्वप्नपरी -- !!!!!!

Started by हर्षद कुंभार, April 22, 2012, 10:42:42 AM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


सगळे संपलय आता.
आता फक्त मी उरलोय,
एकटाच पुन्हा त्याच जागी.


जिथे फक्त मी होतो...
आणि तीच स्वप्नातली परी
जिला मी माझ्या कवितांमध्ये
पाहायचो...


एक असे प्रेम ज्यात इतर
कोणतीच भावना नसायची.
मला हवे तेव्हा तिला भेटायचो
शब्दांचे नजराणे देयचो...


तिच्या विश्वात ....
फक्त ती आणि मी अन माझ्या कविता.
एवढेच काय ते आमचे जग.


ती स्वप्नातली परी...
लाजायची, रुसायची, भांडायची...
पण तिने मलाही समजून घेतले.
मला कधीच सोडून गेली नाही
तेव्हाही अन आजही.


मी मात्र वास्तविक विश्वात
भरकटलो...
स्वप्नातल्या परीला खर रूप
देया गेलो...
तेच प्रेम हिला मागायला गेलो
पण पदरी निराशा...


अर्ध्यावर डाव सोडून गेली ती
मी पर्ण खचलो...
जसे काही काव्यांचीपण साथ
सुटली...


पण पाठीवर तोच हात पुन्हा
मला सावरायला...
डोळ्यात अश्रूंचा काहूर माजला
तिला पाहून...
मी बदललो होतो ,


ती मात्र त्याच जागी माझी वाट
पाहत होती माझी,
मी परतेल या आशेवर
डोळा लावून बसली तीच ती माझी
स्वप्नपरी!!!!!!            - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)