माझे प्रेम पहीले आठवले..(प्रशांत शिंदे)

Started by प्रशांत दादाराव शिंदे, April 23, 2012, 01:43:57 PM

Previous topic - Next topic
तूला पाहून माझे प्रेम पहीले आठवले
अधूरेच राहीले ते मनात आज ही आहे ओलावलेलं
जाता येताना मी असेच तिच्याकडेच पहायचो
तूला बघून प्रेमकळ्या मी फूलवायचो

आज ही मी त्याच वाटेकडेच पाहतो

तूझी वाट पाहत मी तसेच उभा राहतो

त्या वाटेवर आता तू कधीच दिसत नसते

मनात ही माझ्या फक्त विचारांचेच घर असते

ते दिवस गेले निघून
तूला सांगूच शकलो नाही

वाटलं तू माझी होशील
पण....
तूला बोलूच शकलो नाही

कळतच नव्हतं मला मी
तेव्हा होतोच अजान

मूकंच राहीले प्रेम माझे
त्याला नव्हतीच मूळी जूबान..

आज ही तूझी आठवण मी
माझ्या ह्रदयात तशीच आहे

तूझ्या परतीची वाट पाहत मी आजही एकटाच आहे....

तूला पाहून माझे प्रेम पहीले आठवले
पुन्हा माझ्या डोळ्यांत पाणी तू दाटवले....
-
©प्रशांत शिंदे
(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸ .•´ [♥]
☆ º [♥]प्रशू•´ [♥] º ☆