आपलं आयुष्य

Started by vaibhav joshi, April 26, 2012, 03:36:58 PM

Previous topic - Next topic

vaibhav joshi



आपलं आयुष्य म्हणजे स्थित्यंतरे आणि स्थलान्तारांनी ओलांडायचे माप आहे

आयुष्याच्या जत्रे सारख्या चित्राला पालं हलण्याचा शाप आहे

आपलं  आयुष्य म्हणजे नदीच्या पात्रासारखं विस्तारत जाणारं अन प्रवाही

आयुष्य म्हणजे स्वरांमधल्या चढ उतारांसारखं कधी आरोही तर कधी अवरोही

आपलं  आयुष्य म्हणजे म्हणजे धनुष्य असतं

अन  आपले निर्णय हेच असतात आपले बाण

शरसंधान होवो अथवा न होवो

किमानपक्षी एकलव्य होणे हाच आपला धर्म जाण

आपलं  आयुष्य म्हणजे बुद्धीबळाच्या पटासारखं

कधी वजीर, कधी उंट, तर कधी 'पॉन'

आयुष्य म्हणजे नाटकाच्या अंकासारखं

म्हणतं,   'शो मस्ट गो ऑन!'

--- वैभव वसंत जोशी, अकोला


Jyotsna Raut

kHUP SUNDAR AAHE KAVITA.....
KOTYA ANI KALPANA CHHA.......N AHET....
ASHACH SUNDAR SUNDAR KAVITA LIHI........KHUP CHHAN..

केदार मेहेंदळे

आयुष्य म्हणजे नाटकाच्या अंकासारखं

म्हणतं,   'शो मस्ट गो ऑन!'

chan....