उंट चालावा तिरका

Started by muktibodh, April 27, 2012, 08:05:53 AM

Previous topic - Next topic

muktibodh

उंट चालावा तिरका,
घोडा अडीच घरे!
हत्ती उभा आडवा,
वजीराला मात्र स्वातंत्र्य
कसेही चालण्याचे!

का असे आखून दिलेले
मार्गच चोखाळावेत
पटावरील सोंगट्यानी,
यातूनच निघतात
जयापराजयाचे निर्णय!

एकाची हार तर
दुसयाचा विजय,
एकाला दुख: तर,
दुसऱ्याला आनंद,

चला खेळून पाहुया खेळ,
कोणत्याही नियमांत
न बसणारा,
संगीता सारखा
कविते सारखा
किंवा सुंदर शिल्पासारखा,
सगळ्यांनाच आनंद देणारा!

प्रदीप मुक्तिबोध


केदार मेहेंदळे