चल चल चल सोनु-मोनु गंपू-चंपू

Started by Suhas Phanse, April 27, 2012, 11:46:43 AM

Previous topic - Next topic

Suhas Phanse

चल चल चल सोनु-मोनु गंपू-चंपू
चल चल चल सोनु-मोनु गंपू-चंपू
करू सैर सपाटा जंगली तिथं ना, दोस्त खूप,
ससा मोर वानर हूप ॥धृ॥

लंबू जिराफ़  बघे टुकु टुकु,
मोर नाचत बघे लुकु लुकु,
झेब्रा येऊन करतो लुडु बुडु,
खिंकाळतो घोडा रडू रडू,
सिंहा पाहून सारे चूप, ससा मोर वानर हूप॥१॥

उंट तोडी काटेरी हिरवी पर्ण,
हत्ती आहे मोठा लंबकर्ण,
नाचऱ्या अस्वलाचा काळा वर्ण,
पांढरा भालू खाई मोठे मासे पूर्ण,
घूबड ना रागीट खूप, ससा मोर वानर हूप ॥२॥

झोपे मगर सुस्त नदी किनारी,
सारे प्राणी घाबरून ठेवी दुरी,
वानरसेना जाऊन बसली झाडावरी,
नाही हत्तीसुद्धा  येई नदी किनारी,
सारे जण चिडी चूप, ससा मोर वानर हूप ॥३॥

आहे हिप्पोपोटॅमस लई लट्ठ,
त्याच्या समोर उभा आहे गेंडा मट्ठ,
आहे जंगलची माऊ खूप शिष्ट,
पहा आहे किती काळी काळी कुट्ट,
हरीण ना दौडे खूप, ससा मोर वानर हूप ॥४॥

केदार मेहेंदळे

kavita khup chan aahe pan tyyachi alinment nit karayla havi aahe.