फक्त तिच्या(आई)मुळे (कल्पेश देवरे)

Started by Kalpesh Deore, April 27, 2012, 03:05:10 PM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore


फक्त तिच्या(आई)मुळे !


ती उठवूनी रोज सकाळी
प्रेमाने करत असे पोळी
मिसळीत अमृत रस गोळी
ती मजला देत !


ती चिंता करी करारी
मग शाळेची होत तयारी
ती माझं संगे घेत भरारी
ती का करे?


सुटल्यावर बंदिवानातून
मी नाचत जाई रानातून
ती पाहत उभी दारातून
मी हर्षून जाई !


तिला न कळे अभ्यास
बसवे पुस्तकांभावती दोन तास
ठेवा नजरेवर नजर खास
पाहून माझ्याकडे !


ती पाठवे खेळण्यासाठी
मी भांडणाची हो काठी
मिळे सांडशीचे वळ पाठी
रात्रभर रडे !


मग मजला घेई कुशीत
पाठीला हळूच चोळीत
समजावे डोळे पुशीत
प्रेमाने !


ती बोलता बोलता भरे ताट
टाके घासाचे तुकडे तोंडात
हसे खळखळून मजकडे पाहत
मग मी हि हसे !


ती कसली होती शिस्त ?
मी घुमतो आज निर्धास्त
मज वाटे खुपच मस्त
फक्त तिच्यामुळे


कवी - कल्पेश देवरे