प्रेमाचा बहर...

Started by shashaank, April 28, 2012, 11:25:25 AM

Previous topic - Next topic

shashaank

प्रेमाचा बहर...

प्रेमाचा बहर असा की
ऋतू त्याला कुठला नसतो...
एखादा मुखडा अवचित
चंद्राहून सुंदर दिसतो.......

भक्ताला देव कसा तो
जळी स्थळी कुठेही दिसतो...
प्रिय साजण समोर नसता
अंतरी जसा मग स्मरतो....

डोळ्यात उतरते धुंदी
प्रेमाचा कैफच न्यारा......
हरवून जाय स्वतःला
ते प्रेमिक सैरभरारा....

स्मरताना मग सजणाला
मन हरवून सगळे जाते .....
जग नेहेमीचेच अचानक   
मनमोहक सुंदर होते........


-shashank purandare