असाही एक अविस्मरणीय दिवस असावा

Started by Ratnadeep Rane, April 30, 2012, 01:02:50 PM

Previous topic - Next topic

Ratnadeep Rane

उगवत्या सूर्या बरोबरच आठवण तुझी यावी   
पहिल्याच किरणामध्ये प्रतिमा तुझी दिसावी   
गोड स्वप्नामधून कधी समोरही तू यावी
तुला बघून सूर्यसुद्धा लाजावा अशीही एक सकाळ असावी

चढत्या किरणांबरोबर तुझी आठवण अजून खोल वर जावी
भर उन्हामध्ये चालताना साथ तुझ्या सावलीची असावी
तो साथ कायम ठेवायला मात्र हो तुझी असावी
तुझ्या सौंदर्यामध्ये गुंतून  जाईल अशीही एक दुपार असावी

संध्याकाळच्या वेळी जेव्हा घराबाहेर तू निघशील
घरट्याकडे परतणारे पक्षी तुला आठवण माझी देतील
गालावरची बट सावरत मग नक्कीच तू थोडी लाजशील
तुझं लाजणं पाहून मावळणारा सूर्यही थांबावा अशीही एक संध्याकाळ असावी

तुझ्या आठवणीत संध्यकाळही सरली झाली आता निशा 
कधी तरी तू माझी होशील अशी धरली  आहे एक आशा
पक्षी आपापल्या घरट्यात झोपी गेली 
आकाशातला चंद्र दाखवतोय मला प्रेमाची दिशा
त्या चंद्रामध्ये तुझं रूप पाहुनी गातोय मी गाणी
कधी विचार तू ही चंद्राला सांगेल तो माझ्या प्रेमाची कहाणी
कविता वाचून तुझ्या चेहऱ्यावर असं एक स्मितहास्य येऊ दे
की चंद्रालाही आपल्या सौंदर्याबद्दल थोडी शंका होऊ दे
चंद्रालाही तुझ्यातच प्रतिमा स्वतःची दिसावी
अशीही चंद्र ताऱ्यांनी भरलेली एक सुंदर रात्र असावी

तुझ्याविना जगणं म्हणजे जगणं आहे अपूर्ण
रात्र पण सरली आता दिवसही गेला संपूर्ण
आठवून आठवून तुला आठवू तरी किती
तुझ्या आठवणींचा साठा अजून साठवू तरी किती
आठवणींच्या बरोबरच तुझ्या भेटीचाही एक प्रसंग यावा
असाही एक अविस्मरणीय दिवस असावा




                                                                                        कवी :  रत्नदिप   राणे 
                                                                                              खार (पश्चिम), मुंबई
                                                                                              बी. पी. एम. हायस्कूल

 
                                                                                                                         






KARTIKI NIKAM

खरच असा एक अविस्मरणीय  दिवस असावा , जेव्हा तू  फक्त माझ्या सोबत असावा
फक्त तू आणि मी , तुझ्यात मी विसरावं आणि माझ्यात  तू .....
कराच रे संदेश असा एकतरी दिवस नक्की आपल्या आयुष्यात यावा............
तू माझ्याशी बोलशील आणि मी तुझ्याशी, कुठलीच भिंत नसेल आपल्यामध्ये
जेव्हा जुळतील आपली नाती , होईल ना रे हे स्वप्न माझ पुर,
आणशील ना माझ्या आयुष्यात असा एक अविस्मरणीय दिवस..............................
:)

Ratnadeep Rane


खरच असा एक अविस्मरणीय  दिवस असावा , जेव्हा तू  फक्त माझ्या सोबत असावा
फक्त तू आणि मी , तुझ्यात मी विसरावं आणि माझ्यात  तू .....
कराच रे संदेश असा एकतरी दिवस नक्की आपल्या आयुष्यात यावा............
तू माझ्याशी बोलशील आणि मी तुझ्याशी, कुठलीच भिंत नसेल आपल्यामध्ये
जेव्हा जुळतील आपली नाती , होईल ना रे हे स्वप्न माझ पुर,
आणशील ना माझ्या आयुष्यात असा एक अविस्मरणीय दिवस..............................
:)

Mazi kavita vachun chaan reply dilya baddal dhanyavaad Kartiki, tuzya ayushyat naakich asa ek avismarniya divas yeyil

केदार मेहेंदळे