ते अलवार तरल नाजुक क्षण ..!!

Started by dhanaji, May 07, 2012, 05:32:40 PM

Previous topic - Next topic

dhanaji

कसे होते ते क्षण ..?
तरल अनुभव ..
नाजूक क्षण..!
फिरून फिरून डोकावून
हरवून जातेय माझे मन
ते अलवार नाजूक तरल क्षण

खूप छान
मस्त देखणी
छान साडी
साधी साधी
नाकी डोळी
सुंदर सुंदर
विसरून गेले
ते मी पण

त्या नजरेचा
स्पर्श मुलायम ...
हलके हलके
बावरून मन
आभाळातील शुभ्र ढग
मनास पिंजून ...
मनावरून गेले फिरून
ते अलवार नाजूक तरल क्षण

किती काळ उलटून गेला
छान दिवस हरवून गेले
निळ्या निळ्या आठवणीचे
अजून मला स्वप्न पडते
अजून मन धुंदावून...
आठवून मन व्याकुळ ..होते .
ते अलवार नाजूक तरल क्षण .......!!

prAKASH