सांगली-पुणे

Started by प्रशांत नागरगोजे, May 21, 2012, 05:19:16 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

१६ मे रोजी काही कामानिमित्त पुण्याला गेलो होतो. मिरज ते पुणे, सह्याद्री एक्सप्रेसने सुमारे ६ तास लागतात पुण्यात पोहचायला. गाडी रात्री १२ वाजेला होती, मी आणि माझे मित्र रात्री १२ वाजेला मिरजेहून निघालो. रिझर्वेशन नव्हतं त्यामुळे जनरलने प्रवास करावा लागणार होता. गाडीत नेहमीप्रमाणे गर्दी होतीच, काय म्हणतात ना ते पाय ठेवायलाही जागा नव्हती. पण आमच्या पायांना फक्त जागा भेटली, बाकी आम्ही पायांवरच उभे होतो. गाडी कोल्हापूरहून आल्यामुळे बरीच गर्दी होती. जो-तो कशीबशी जागा धरून बसला होता. काहीजण कोणाचीही परवा न करता वरच्या सीटावर आडवे पडले होते, कोणी खालीच बसले होते, लोळत होते. काही थकलेले चेहरे, काही चेहऱ्यांवर भावच नव्हते तर काही आमच्यासारखे उभा राहून प्रवास करतोय म्हणून मंद स्मित करणारे. काही टवाळक्या करणारी पोरही होती. जागा भेटलेली मानसं निवांत होती, आणि ज्यांना जागा भेटली नाही ते वाट पाहत होते, समोरचं स्टेशन येण्याची.

आम्ही जिथे उभे होतो, तिथे एक बाई आमच्या पायाशीच झोपलेली. आमच्यामुळे बोगीत गर्दी वाढली तेव्हा तिला जाग आली, ती उठून उभा राहिली. डोळ्यांत झोप होती, उभा राहूनच ती डुलक्या मारत होती. मग तिला एका सद्गृहास्ताने थोडीशी जागा दिली. ती बसली आम्ही मात्र उभे होतो समोरचं स्टेशन येण्याची वाट पाहत. मधेच त्या पोरांनी दंगा सुरु केला, जो-तो एकमेकांना शिवीगाळ करू लागला. ती पोरंच, शिकलेली वाटत नव्हती, मग असं वागण आलंच. पण हे त्या बाईला जमले नाही, आणि ती त्या पोरांवर खेकसली," काय रे, लाज वाटत नाही का असलं वात्रट बोलताना? काय मुर्ख आहात का? " त्यावर त्या पोरांतला एक मुलगा म्हणाला," काय झालं मावशी, आमचं आमच्यात चालू आहे, तुम्हाला कोणी काही बोलत नाही." त्यावर बाई," मावशी आहे का मी?" मग दुसरा मुलगा पहिल्याला म्हणाला," अरे मावशी म्हणू नको रे, राग येतो."  यावर मी मनात भरपूर हसलो. पुढे त्यांची वाचावाची चालूच होती, कोणी कोणाच ऐकून घ्यायला तयार नव्हते. मी मात्र या वादाचा आनंद घेत होतो.                 

काही वेळाने किर्लोस्करवाडी स्टेशनवर बोगीतून बरेचजन उतरले, त्यांत ती पोरही उतरली आणि आम्हालाही जागा भेटली. ती बाई आणि तो सद्गृहस्त आमच्या समोरच बसले होते. प्रवास सुरु झाला, रात्रीची वेळ होती, आणि झोपेने डोळ्यांवर कब्जा केला होता. कसातरी दमदाटीत बसलो होतो, तिथे आता झोपताही येईना. तरी मी आणि माझा मित्र एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपत होतो, तोल जात होता तरी तोल सावरत झोपत होतो. प्रवास चालू होता.

पुढे ३:३० च्या आसपास ती बाई त्या माणसावर देखील ओरडली," ओ, धक्का मारू नका. बसायचय तर नीट बसा." माणूस," ओ बाई, धक्का काही मारला नाही, गाडी चालू आहे चुकून धक्का लागला असेल." पुढे त्या बाईची वटवट चालूच होती, तो माणूस मात्र काही लक्ष न देता शांत बसला होता. मलाही वाटलं, काय माणसाची जात बाई दिसली की काहीतरी खोड काढायचीच. थोडा वेळ गेला, नंतर त्या बाईने वही काढली आणि काहीतरी लिहू लागली. तो माणूस चोरून चोरून काय लिहितेय ते पाहण्याचा प्रयत्न करत होता पण नजरेला काही गवसत नव्हते. हे त्या बाईला कळाले आणि ती पण आता झाकून झाकून लिहायला लागली. तेव्हा माझ्यातालाही लेखक जागा झाला, पण लिहायला वही पेन काही नव्हत. म्हणून मी रोबीन शर्माच " व्हू विल क्राय व्हेन यु डाय" हे पुस्तकं वाचायला घेतलं. हे पुस्तक मी दुसऱ्यांदा वाचत होतो, पण वाचताना तितकच प्रोत्साहित वाटत होतं.

काही वेळाने त्या बाईला झोप लागली, ती झोपली डोकं बाजूच्या माणसाच्या खांद्यावर ठेवून. मी मनातच म्हणालो," धक्का लाऊ नको म्हणणारी बाई, चक्क खांद्यावर झोपली की." तेव्हाच मनात आलं, चला लिहायला काहीतरी सापडलं. पुस्तकाचे १०  पाठ संपवून मी पण झोपी गेलो, माझ्या मित्राच्या खांद्यावर डोकं ठेवून.

परत ४:२० च्या आसपास तोच आवाज," ओ, दुसऱ्यांदा सांगतेय धक्का मारू नका." तो सज्जन माणूस देखील दुसऱ्यांदा तेच म्हणाला," ओ बाई, गाडी चालू आहे, चुकून लागला असेल धक्का." तरी बाईची वटवट चालूच.
तेव्हा मनात विचार आला, नेहमी माणूसच चुकतो असे नाही. त्या बाईला सांगाव वाटलं," ओ बाई, ३:५०  ते ४:२० तुम्ही जे त्या माणसाच्या खांद्यावर मस्तक ठेवून झोपला त्याचं काही वाटलं नाही का तुम्हाला? चालू गाडीत धक्का लागणारच, एक धक्का लागला तर काय हो गनगन तुमची. तिथे खाली पायाजवळ लोळत होतात ना तीच जागा तुम्हाला ठीक होती. त्या माणसाने तुम्हाला थोडी का होईना जागा दिली, त्याचे उपकार मानायचे सोडून तुमची वटवट चालूच आहे." पण मी काहीच नाही बोललो, सर्व मनांत ठेवले पेपरवर उतरवायला.

तेव्हाच माझ्या बाजूचा माणूस मला म्हणाला," जरा पलीकडे सरका हो, बसता येईना." मी पाहिलं तर ती बाई आमच्या सीटवर पाय ठेवून बसली होती. मी त्या माणसाला जरास जोरातच म्हणालो," ओ मामा, ते पाय ढकला खाली आणि झोपा निवांत. आता पायांना पण जागा द्यायची का?" त्या बाईने गुपचूप पाय खाली घेतले, कसलीही वटवट न करता.                                                         

Anirudha Bansod

यशस्वी लोक कधीच आपल्या निकालाचे
नियोजन करून ठेवत नाहीत ,ते फक्त सुरवात
कशी करायची ह्यावर जास्त भर देतात ,कारण
सुरवात हि बरोबर आणि संघर्षाने केलेली असेल
तर निकाल हा त्यांचाच पक्षात
असतो ....नेहमीच चांगली सुरवात करा

प्रशांत नागरगोजे

बरोबर बोललात अनिरुद्धजी...  धन्यवाद