प्रेमसागर...

Started by shashaank, May 23, 2012, 12:53:41 PM

Previous topic - Next topic

shashaank

प्रेमसागर...

वेडेच करतात प्रेम
प्रेम करते वेडे
शहाणे काय जाणतील
त्याची गोडी बरे ??

प्रेम आंधळं असतं
लोक सारे म्हणतात
लोक काय म्हणतील
प्रेमवीर थोडेच जाणतात...

ओढ कुणाला पैशाची
तर कुणाला मानाची
ओढ लागता प्रेमाची
फिकीर नसते जीवाची....

एकमेकांसाठी प्रेमी
किती तळमळत असतात
दूर राहूनही
आठवणीतच जगतात....

आपली कोणी आठवण काढतंय
यासारखं सुख नाही
एक साधा कटाक्षही
मनमोहर फुलून फुलून येई.....

नावं कशाला ठेवता
प्रेमाला, प्रेमवीरांना
एकदा तरी अनुभव घ्या
प्रेमसागरात बुडताना........


-shashaank purandare.



shashaank


viddyasagar