तरी जगतो आहे......

Started by genius_pankaj, May 24, 2012, 01:00:11 PM

Previous topic - Next topic

genius_pankaj

नकोनकोसा जीवन कलह
त्यात तिचा तो विरह
सारेच कसे असह्य
तरी जगतो आहे......

गाडीतली ती गर्दी
प्राण कंठाशी अगदी
पण चणचण त्या नगदी
तरी जगतो आहे......

आशेच्या नभात अभ्र झाले गोळा
भावनांचा साफ चोळामोळा
मनी झुले रिकामाच हिंदोळा
तरी जगतो आहे.......

विचारांचा साचला चिखल
कित्येक प्रश्नांची न उकल
जन झिडकारिती सकल
तरी जगतो आहे......

कोमेजलेल्या इच्छा
कोणीही न करी पृच्छा
निराशेचा सततचा पिच्छा
तरी जगतो आहे........

खोल रुजलेली कृष्णविवरे
सतत ओले पापण्यांचे किनारे
नियती सदा खड्ग उगारे
तरी जगतो आहे.....

पण किती दिवस राहतील बंद दैवाची दारे
तिमिरालाही असते प्रकाशाचे भय रे
वाहतीलच कधीतरी चैतन्याचे वारे
म्हणून जगतो आहे......


genius_pankaj


केदार मेहेंदळे


balrambhosle


swati121


jyoti salunkhe


मिलिंद कुंभारे

विचारांचा साचला चिखल
कित्येक प्रश्नांची न उकल
जन झिडकारिती सकल
तरी जगतो आहे......

तिमिरालाही असते प्रकाशाचे भय रे
वाहतीलच कधीतरी चैतन्याचे वारे
म्हणून जगतो आहे......

खूप छान आहे कविता!