प्रेमाची कविता

Started by blue.god, June 05, 2012, 11:13:08 AM

Previous topic - Next topic

blue.god


एक कविता लिहिणार आज प्रेमाची
शब्दांचा नवस लावणार गोची करणार देवाची
नवसा मागून नवस प्रेमाचे लावत जाणार
माझे प्रेमाचे शब्द वाचून थकलेला देवही मग कौल देणार
प्रेमाची कविता कधीच पूर्ण नाही करायची
नशिबाचीच आज नीट थट्टा करायची
पण आज प्रत्येक शब्द माझाच कविते वर आहे रुसला
माझाच कवितेला  दिलेला तू  नकार प्रत्येक शब्दाला कळला



केदार मेहेंदळे