साथ तुझी हवी आहे..

Started by mylife777, June 14, 2012, 11:03:18 AM

Previous topic - Next topic

mylife777

कधी तर असा भास होत आहे
कि वाटे मी स्वप्नातच आहे.
                        साथ तुझी हवी आहे..
आज हे स्वप्न सत्यात आहे
खरेच आज सत्य होत आहे.
                          साथ तुझी हवी आहे..
हृदयाची हृदयाला प्रेमाची जाण आहे
अनुबंध हे जणू युगान्युगांचे आहे.
                          साथ तुझी हवी आहे..
नाते हे प्रेमाचे, दोन जुळल्या मनाचे आहे
आज जणू डोळ्यातले अश्रू हसत आहे.
                              साथ तुझी हवी आहे..
आज जणू आपल्या प्रेमाचा सूर्योदय झाला आहे
आता आयुष्याच्या सुर्योस्तानंतरहि.
                               साथ तुझी हवी आहे..
कधी होईल तर रुसवा
वाटेत सोडून जाऊ नको रे  मला.
                          तेव्हा साथ तुझी हवी आहे..
आयुष्यातील संघर्षाचा, कष्ट रुपी आयुष्याचा
आपण दोघे मिळून करू सामना त्यांचा.
                          तेव्हा साथ तुझी हवी आहे..
करतो ईश्वर चरणी प्राथर्ना आता
कृपा करशील आम्हावर आता
पुढल्या जन्मोजन्मान्ताराचा साथ राहो आता.
   - रवी बांगडे