स्वानंदी आनंद घडे (विडंबन)

Started by janki.das, June 16, 2012, 07:41:45 PM

Previous topic - Next topic

janki.das


स्वानंदी आनंद घडे, कविताच कविता चोहिकडे

वरती खाली नाद भरे, वायूसंगे शब्द फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
शब्द विहरतो चोहिकडे !

काव्य गाणे सोनेरी हे, वात्रटिका ही हसते आहे
खुलली संध्या काव्याने, आनंदे गाते गाणे
लोक दंगले, चित्त भंगले, गाने विरले
जिकडे , तिकडे, चोहिकडे!

भोवताली हे कवी कसे, डोकावुनि हे पाहतसे
कुणास बघती ? आयोजका ; आयोजका भेटला का त्याना ?
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
जिकडे, तिकडे, चोहिकडे!

गाती गाणी मंदगती, डोलति स्वता:च वृक्षप्रती
श्रोते सारे निजले रे, मग कोणाला गातात बरे ?
गाणे जमले, सर्व गुंगले, डोलत वदले
जिकडे, तिकडे, चोहिकडे!

कवितेच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना ब्रेक कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
जिकडे, तिकडे, चोहिकडे

-- रमेश ठोंबरे

बालकवी (ठोंबरे) यांची माफी मागून

केदार मेहेंदळे