पोरगी पास होता होता {विडंबन कविता}

Started by janki.das, June 16, 2012, 07:48:17 PM

Previous topic - Next topic

janki.das

दहावी नापास विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.पण हे अपयश म्हणजे सर्व संपले असे नव्हे.त्यातून खंबीरपणे बाहेर येणे आवश्यक.सांगण्याइतके ते सोपे नाही पण प्रयत्न करू या आणि चला थोडे हसू या.कृपा करून याला जखमेवरेचे मिठ समजू नका.कविवर्य कै.सुरेश भट यांच्या "उःषकाल होता होता" ह्या गीताचे विडंबन.


पोरगी पास होता होता नापास झाली
अरे पुन्हा ट्युशन लावा सांज सकाळी.

आम्ही तिच्या एसेसीची आस का धरावी
पालथ्याच ह्या घड्याने तहान भागवावी
सरस्वती पाहून तिजला बघहो लाजली
अरे पुन्हा ट्युशन लावा सांज सकाळी.

तेच धडे घेती फिरूनि मास्तरच्या कतारी
पण दंश करिती तिजला परिक्षक विषारी
आम्ही फक्त स्माईल देतो ओशाळलेली
अरे पुन्हा ट्युशन लावा सांज सकाळी.

आशा होती कॉम्पुटरने गडबड करावी
मार्कशिट मेरीटवाली हिच्या नावे द्यावी
द्याहो कुणी ऑपरेटरला भांगेची गोळी
अरे पुन्हा ट्युशन लावा सांज सकाळी.

एकच उपाय आता, मुख्यमंत्रि व्हावे
मुलीकडे लक्ष द्याहो, आदेश द्यावे,
आमची बेबी आमचे स्वप्नी Ph.D.झाली
अरे पुन्हा ट्युशन लावा सांज सकाळी.

--
प्रा.सुरेश खेडकर,नागपूर

केदार मेहेंदळे