एक ती

Started by ankush.sonavane, June 19, 2012, 05:43:14 PM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

                   एक ती

संध्याकाळच्या वेळी काळोख दाटून आला
वेडावलेला वारा सुसाट वाहू लागला.
वाऱ्याने तर मनात भिती निर्माण केली
सोबत त्याच्या एक पावसची सर आली.

       झाडाखाली उभा राहुन स्वताला  सावरत होतो
       पडणाऱ्या पावसाच्या थेंबाकडे तिरस्काराने पाहत होतो.
       एवढ्यात  कोणीतरी  माझ्याजवळ आली  होती
       माझ्या भिजणाऱ्या डोक्यावरी छत्री धरली होती.

काही न बोलता तिच्या सोबत चालू लागलो
डोक्यातील विचारांच्या वादळात आडकून गेलो.
माझ्यामुळे ती पावसात भिजत होती
खांद्यावरची ओढणी  हळुवार सावरत होती.

       पावसापासून तिला वाचवण्याचा विचार मनात आला
       तिला जवळ घेण्यासाठी हात तिच्या खांद्यावरी  ठेवला.
       विजेच्या वेगाने तिने माझ्याकडे रोखून पहिले
       माझ्या डोळ्यातील भाव तिला समजून आले.


चालताना अंगाला स्पर्श होताच दचकून जात होती
अधून मधून ती नकळत  माझ्याकडे पाहत होती.
क्षणातच आकाशात वीज चमकून गेली
पापणी उघडण्या आधी तिने मला मिठ्ठी मारली.

       माझ्याही हाताने  तिला मिठ्ठी मारली होती
       पावसात दोन पाखरे ओलीचिंब झाली होती.
       नजरेत नजर अन  श्वासात श्वास गुंतला होता
       सगळी कडे पाखरांचा किलबिलाट सुरु झाला होता.

हळूहळू तिची मिठ्ठी सैल होत होती
ती आता माझ्यापासून दूर जात  होती.
खिडकीतून हाताने मला निरोप देत होती
व्याकूळ नजरेने माझ्याकडे पाहत होती.

        कोण होती ती याच विचारात गुंतून गेलो
        जड पावलाने घरी परतू लागलो
        आज ही  पाऊस पडताच त्या रस्त्याने जातो
        ती येयील या वेड्या आशेवरी भिजतच चालत राहतो.               
                                                    अंकुश सोनावणे                                 

केदार मेहेंदळे


nalini


VIKAS DAWARE

I have no words to say some thing about this poem ,great

Nik

Sundar, srekh, kya bat hai...

harshvardhan patil

superrrrrbb, very nice poem ........ zindgi tere naam